मालवण (प्रतिनिधी) - पिग्मी एजंट यांना मिळणाऱ्या ३ टक्के कमिशनमध्ये कपात करून २.५० टक्के करण्याच्या सहकार खात्याच्या आदेशामुळे हवालदिल झालेल्या पिग्मी एजंट यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन लक्ष वेधले. पिग्मी एजंटांचे कमिशन पूर्ववत करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी करणारे निवेदन आमदार निलेश राणे यांना पिग्मी एजंटांकडून देण्यात आले. मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी आम. निलेश राणे यांची पिग्मी एजंटांनी भेट घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, मालवण उपनगराध्यक्ष दिपक पाटकर आदी उपस्थित होते.
राज्याच्या सहकार खात्याकडून राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये पिग्मी संकलन करणाऱ्या पिग्मी एजंटांना ३ टक्के ऐवजी कमाल २.५० टक्के कमिशन देण्याचा आदेश काढण्यात आला आहे. पिग्मी एजंट ऊन, पाऊस अशा प्रतिकूल परिस्थितीत ठेवीदारांच्या व्यवसायाच्या ठिकाणी, निवासस्थानी जाऊन पिग्मी स्वरूपात ठेवी गोळा करतात. पिग्मी एजंट ज्या पतसंस्थेसाठी पिग्मी संकलन करीत आहेत त्या संस्थेला एक आपलेच कुटुंब मानून सध्याच्या महागाईच्या काळातसुद्धा पूर्वीचे ३ टक्के कमिशन पुरेसे नसतानाही यामध्ये वाढ करण्याची मागणी कधीही केली नाही.
सध्या इंधनाचे वाढत असलेले दर आणि महागाईच्या काळात या कमी केलेल्या तुटपुंज्या पिग्मी कमिशनमध्ये काम करणे अशक्य होणार आहे. खर्च आणि मिळकत यामध्ये ताळमेळ बसणे कठीण झाले आहे. त्यामुळे पूर्ववत पिग्मी कमिशनसाठी आपण पाठपुरावा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार निलेश राणे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी आमदार निलेश राणे यांनी हा संपूर्ण राज्याच्या अखत्यारीत येणारा विषय असून याबाबत योग्य ती माहिती घेऊन संबंधीत खात्याशी चर्चा करून पिग्मी एजंटांना निश्चितच न्याय मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.












































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.