loader
Breaking News
Breaking News
Foto

सुधीर दामले यांच्याकडून वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला २५ हजारांची देणगी

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाने नुकताच २ लाख ग्रंथ संग्रहाचा संकल्प करून रत्नागिरीकरांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वाचनालयाला ग्रंथनिधी अगर ग्रंथ भेट द्यावेत, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले होते. सुधीर दामले यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत गुरुवार दिनांक २१ मे रोजी वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांचेकडे रुपये २५ हजारांचा धनादेश २ लक्ष ग्रंथ संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपले योगदान म्हणून प्रदान केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी इतक्या पुरातन वाचनालयाला ग्रंथ खरेदीसाठी निधी देताना मनापासून धन्यता वाटते. ग्रंथ सेवा ही ईश्वर सेवा आहे. आपल्या रत्नागिरीतील वैभवशाली अशा ग्रंथालयात वाढदिवसानिमित्त योगदान देता आले याचा मनस्वी आनंद होतो असे सुधीर दामले म्हणाले. याप्रसंगी सुधीर दामले यांचा पुष्प आणि शुभेच्छा पत्र देऊन सन्मान करण्यात आला. सुधीर दामले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ खरेदीसाठी योगदान देऊन एक वेगळे प्रेरणादायक उदाहरण रत्नागिरीकरांसमोर ठेवले आहे, असे सांगत सुधीर दामले यांना शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg