loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारूसह ट्रक जप्त; पोलिसांची कारवाई

बांदा (प्रतिनिधी) - गोव्यावरून सिंधुदुर्ग मार्गे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर इन्सुली चेकपोस्ट येथे पोलिसांनी कारवाई करत मद्यसाठ्यासह ट्रक जप्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांदा येथील इन्सुली चेकपोस्टवर पोलीस कॉन्स्टेबल राकेश चव्हाण व हेरलेकर हे ड्युटीवर असताना नियमित वाहन तपासणी करत होते. त्यावेळी ट्रक क्रमांक MH 08-W-1122 संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा आढळून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस सहाय्यक निरीक्षक पंकज शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई केली. पोलिसांनी ट्रकमधून ९ हजार ३६० रुपये किमतीच्या ‘ओक्स्मीत’ कंपनीच्या १२ बाटल्यांचा बॉक्स, ११ हजार १०० रुपये किमतीच्या ‘रॉयल स्टॅग’ कंपनीच्या १५ बाटल्यांचा बॉक्स, तसेच ३ हजार रुपये किमतीच्या ‘हेवर्ड फाईन व्हिस्की’च्या १२ बाटल्यांचा बॉक्स असा मद्यसाठा जप्त केला. याशिवाय सुमारे १० लाख रुपये किमतीचा ट्रकही जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राकेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg