loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण किनारपट्टीची सुरक्षा अधिक भक्कम आणि वेगवान करण्याच्यादृष्टीने रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात स्पीड बोट दाखल

​रत्नागिरी : कोकण किनारपट्टीची सुरक्षा अधिक भक्कम आणि वेगवान करण्याच्यादृष्टीने रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात दुरूस्त करून आणलेली स्पीड बोट नव्याने दाखल झाली आहे. सुमारे १ कोटी रुपये खर्च करून ही बोट नवीन बनवण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या शुभहस्ते या स्पीड बोटीचे पूजन करून ती अधिकृतपणे सेवेत दाखल झाली. या स्पीड बोटीमुळे समुद्रातील पोलिस दलाची गस्त अधिक मजबूत आणि वेगवान होणार आहे. ​जिल्ह्याला मोठा आणि संवेदनशील समुद्रकिनारा लाभला आहे. या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा अबाधित राखणे हे पोलिस प्रशासनासमोरील मोठे आव्हान असते. पोलिस दलात समाविष्ट करण्यात आलेली ही नवी स्पीड बोट सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

किनारपट्टीवर संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी, नियमित सागरी गस्त घालण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन किंवा संकटकालीन परिस्थितीत समुद्रात तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पोलिस दलाला ८ स्पीड बोटी मिळाल्या होत्या. परंतु या स्पीड बोटी खराब झाल्यामुळे त्या सध्यातरी कुचकामी ठरत आहेत. कारण या बोटींच्या दुरूस्तीसाठी मोठा खर्च असल्याने टप्प्या टप्प्याने या नादुरूस्त बोटींची दुरूस्ती सुरू आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात एक बोट सहा महिन्यांपूर्वी दुरूस्तीला देण्यात आली होती. त्यावर १ कोटी रुपये खर्च करून दुरूस्ती केली. आज ती नव्याने पोलिस दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

टाईम्स स्पेशल

पोलिस दलादील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवत नव्याने ती सागरी गस्तीसाठी समुद्रांच्या लाटांवर बोट स्वार झाली. यावेळी पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बोटीच्या तांत्रिक क्षमतेची आणि कार्यपद्धतीची माहिती घेतली. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही बोट केवळ गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठीच नव्हे, तर किनारपट्टीवरील नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एक भक्कम कवच ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg