रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे माजी सैनिकांसाठी भव्य 'छत्रपती श्री संभाजी महाराज सैनिक संकुल' उभारण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला राजकीय वजनामुळे मोठा फटका बसला आहे. चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या हक्काच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत, राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी हे नियोजित सैनिक संकुल रत्नागिरी जिल्ह्याऐवजी स्वतःच्या सातारा जिल्ह्यासाठी मंजूर करून घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे कोकणातील माजी सैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
आमदार शेखर निकम यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना अधिकृत पत्र देऊन चिपळूण येथे या संकुलाची अत्यंत गरज असल्याचे सविस्तर पटवून दिले होते. चिपळूण तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ६ हजारांहून अधिक कॅन्टीन कार्डधारक आणि सुमारे ५ हजार ई.सी.एच.एस. आरोग्य सेवेचे लाभार्थी माजी सैनिक आहेत. सद्यस्थितीत या सेवा चिपळूणमध्ये भाड्याच्या जागेत सुरू असून, वयोवृद्ध आणि आजारी सैनिकांना तिथे जाण्यासाठी आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व सेवा एकाच छताखाली आणण्यासाठी आमदार निकम यांनी एस.टी. स्टँडलगतच्या शासकीय जागेचा उत्तम पर्याय सुचवून या प्रकल्पासाठी सैनिक कल्याण विभागाकडून निधीची तरतूदही करून घेतली होती.
या प्रकल्पाच्या अंतिम मंजुरीसाठी राज्य व्यवस्थापकीय समितीची विशेष सभा होणे गरजेचे होते, जी गेल्या १२ वर्षांत झाली नव्हती. आमदार निकम यांनी ही सभा तातडीने घेऊन निर्णय घेण्याची विनंती मंत्री महोदयांना केली होती. मात्र, मंत्री शंभूराज देसाई यांनी रत्नागिरीच्या या हक्काच्या आणि महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी देण्याऐवजी, राजकीय अधिकाराचा वापर करत हे संकुल थेट आपल्या सातारा जिल्ह्यासाठी वळवले. आमदार निकम यांनी तळमळीने केलेल्या प्रयत्नांनंतरही, केवळ मंत्र्यांच्या पक्षपाती निर्णयामुळे कोकणातील वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. शासनाच्या आणि मंत्र्यांच्या या भूमिकेविरोधात आता कोकणातून तीव्र राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.












































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.