loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभाळजाई आरोग्य शिबिरास उत्तम प्रतिसाद

खेड (प्रतिनिधी) - श्री कुंभाळजाई देवी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने तालुक्यातील किंजळे येथील श्रीमती सरस्वती रावजीशेठ जाधव हायस्कूलमध्ये आयोजित मोफत आरोग्य शिबिरात १२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. लाभार्थ्यांना संस्थेमार्फत वैद्यकीय चाचण्यांची माहिती नमूद असलेले 'वैद्यकीय कार्ड' उपलब्ध करून देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालय व बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल यांचेही सहकार्य लाभले. ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य शिबीर, महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करून तपासणी करण्यात आली. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांसाठी संस्थेने मोफत वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध करून दिल्याने रुग्णांची मोठी सोय झाली.

टाईम्स स्पेशल

धवडे बांद्री विभागातील अतिशय दुर्गम भागात विविध दुर्मीळ अशा वैद्यकीय चाचण्या एका छताखाली उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून नवनवीन आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही, संस्थेचे अध्यक्ष विनोद मोरे यांनी दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री कुंभाळजाई देवी सामाजिक विकास संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg