मुंबई : अंगाची अक्षरशः लाही लाही होत होती. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मुबलक पाऊसपाणी होणार किंवा नाही? या चिंतेने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. लोक चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. त्यातच आज सकाळी मुंबईतील काही भागांत मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावल्यामुळे उकाड्यामुळे हैरान झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट अजून कायम असून, नागरिकांना अजूनही उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, मुंबईत सध्या वाढत्या तापमानाने कहर केला आहे. काल येथील तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. अगोदरच दमट वातावरण आणि त्यात या वाढत्या तापमानामुळे नागरीक अक्षरशः हैरान झाले होते. पण आज सकाळी पावसाने मुंबईतील मुलुंड, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप आदी भागांत हजेरी लावली. सकाळच्या वेळी अचानक झालेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पण काही वेळ बरसलेल्या पावसाच्या या मान्सूनपूर्व सरींमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. हवामान खात्याने पुढील 36 ते 48 तासांत अनेक भागांत पावसाचा जोर वाढेल असे म्हटले आहे.












































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.