loader
Breaking News
Breaking News
Foto

पत्रादेवी हायवेवर झालेल्या भीषण अपघातात सावळवाडी येथील नारायण सावळ यांचा दुर्दैवी मृत्यू

बांदा (प्रतिनिधी) - पत्रादेवी हायवेव झालेल्या भीषण अपघातात सावळवाडी येथील नारायण सहदेव सावळ (वय ६४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात सावळ गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून सावळवाडी गावावर शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg