loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत ‘बागुल बुवा’ पोलिसाची दहशत; अनेकांकडून विना वर्दी वसुली

​रत्नागिरी - शहरात पोलिस खात्याकडून अनेक दर्जेदार कामे होत असताना शहरातील गोखले नाका, काँग्रेस भवन आणि राधाकृष्ण पोलीस चौकी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. या चौकीतील कर्मचारी आपला "बागुल बुवा" दाखवून अनेकांवर आपली दहशत निर्माण करत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. कधी वर्दीत तर कधी साध्या वेषात येऊन वसुलीचे प्रकार सुरू असल्याने अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस कर्मचारी ऑन ड्युटी नसताना किंवा गणवेशात नसतानाही कारवाईचा आव आणत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर किंवा संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मोहिमेचा गैरफायदा हे कर्मचारी घेत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. नागरिकांना पकडून, त्यांना कायद्याची भीती दाखवून हजारो रुपयांची मागणी केली जात असल्याचे बोलले जात आहे. ​‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचे पालन करून प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या पोलीस दलात अशा प्रवृत्तींमुळे संतापाचे वातावरण आहे. काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या स्वार्थापोटी संपूर्ण पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होत आहे.

टाइम्स स्पेशल

​या "अवैध वसुली" प्रकरणाची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी रत्नागिरीकरांकडून केली जात आहे. गोखले नाका परिसरातील या प्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे, जेणेकरून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य टिकून राहील. ​अवैध वसुलीच्या या प्रवृत्तीमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा जात असल्याची भावना सध्या रत्नागिरीत व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg