मालवण (प्रतिनिधी) : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा 25 ते 26 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. 26 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता मालवण मधील किल्ले सिंधुदुर्ग शिव राजेश्वर मंदिरास भेट देणार आहेत. यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मालवण तसेच सिंधुदुर्गातील युवा वर्गाने स्वागतासाठी व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केले आहे. मालवण भाजप कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषद मध्ये चव्हाण हे बोलत होते. यावेळी नगरसेवक मंदार केणी, भाजप शहर सरचिटणीस पंकज सादये, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राकेश सावंत, युवा पदाधिकारी कुणाल खानोलकर, फ्रान्सिस फर्नांडिस उपस्थित होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणले, भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज धनंजय महाडिक यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा 25 ते 26 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. 26 एप्रिल रोजी मालवण येथे आगमन होणार आहे. या निमित्ताने "युवा शक्ती जागर यात्रा" कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना व युवा वर्गाला भेट देणार आहेत.
26 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता मालवण येथे आगमन होणार आहे. यावेळी किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर राजकोट किल्ला येथील भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर रॉक गार्डन येथे जिल्ह्यातील सोशल मीडिया एम्प्लॉएनसर यांचा कॉफी विथ इनफ्लूयन्सर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, मालवण तसेच सिंधुदुर्गातील युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केले आहे.































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.