loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा घाटातील ३ बोगद्यांच्या डीपीआर अंतिम टप्प्यात

रत्नागिरी - मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. मिऱ्या ते आंबा घाट असा ५७ किमीचा टप्पा आहे. घाटात निम्म्यापर्यंत चौपदरीकरण झाले आहे. उर्वरित 7 किमी घाट एका रेषेत नसल्याने ३ बोगदे काढण्यात येणार आहेत. त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) सुरू आहे. पुढील तीन महिन्यामध्ये तो पुर्ण होईल. सह्याद्रीचा पर्वत पोखरून हा मार्ग काढला जाणार आहे. डीपीआर करताना तीन पर्याय देण्यात येणार आहेत. त्यापैकी एकाला मंजूरी मिळणार आहे. अतिशय़ खर्चिक बाब असल्याने हा प्रस्ताव मागे पडला होता. परंतु आता त्याला वेग आला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही अधिकृत माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिऱ्या ते आंबा घाट अशा सुमारे ५७ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणातील ९० ते ९५ टक्के काम झाले आहे. उर्वरित काम या पावसापूर्वी २०२६ पूर्ण करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. यामधील महत्वाचे म्हणजे आंबा घाटात निम्यापर्यंत चौपदरीकरण झाले आहे. त्यापुढे रूंदीकरण करणे शक्य नसल्याने पर्याय म्हणून आंबा घाटात ३ बोगदे म्हणजे भूयारी मार्गाचा विचार झाला आहे. त्याचा सर्व्हे करण्याचे काम पूर्ण झाले असून आता याचा डीपीआर सुरू आहे. त्यानुसार संबंधित एजन्सीकडुन ज्या ठिकाणी चौपदरीकरण पूर्ण होते तेथून पुढे तळवडेमध्ये जिथे चौपदरीकरण सुरू होते तिथे हा भुयारी मार्ग निघणार आहे. आता हा डीपीआरमध्ये अनेक विषय पुढे येतील. त्याचा एकुण खर्च, कोण कोणते पर्याय आणि किती मी हा मार्ग होणार हे स्पष्ट होईल. डीपीआर पूर्ण करण्यासाठी अजन ३ महिने लागतील असे सांगण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg