loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; वेर्ले, शिरशिंगेसह सह्याद्री पट्ट्यात मोठे नुकसान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील अनेक भागांना वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला. विशेषतः सह्याद्रीच्या पट्ट्यात वादळाने अक्षरशः दणादण उडवून दिली असून, अनेक ठिकाणी घरांची पडझड व झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ​तालुक्यातील वेर्ले-देऊळवाडी येथील सुरेश आत्माराम नाईक यांच्या राहत्या घराचे अतिवृष्टी आणि वादळामुळे मोठे नुकसान झाले. वाऱ्याच्या वेगामुळे त्यांच्या घराचे छप्पर उडून गेले असून, यात सुमारे ४० हजार रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, वेर्ले-फौजदारवाडी येथील अर्जुन रामा सावंत यांच्या मांगराचेही छप्पर उडाल्याने त्यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ​शिरशिंगे परिसरातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. देवसु येथे चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने मंगेध धोंडी परब यांच्या राहत्या घरावर मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या घराचे अंदाजे ५ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. ​आज झालेल्या या अवकाळी संकटामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांची मोठी धांदल उडाली. महसूल विभागाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून बाधितांना भरपाई द्यावी, अशी मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg