सावंतवाडी: प्रतिनिधी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान (सिंधुदुर्ग विभाग) आणि राष्ट्रवीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत 'शिवकालीन मर्दानी खेळांचे' भव्य प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक २१ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत सकाळी ७:०० ते १०:०० या वेळेत हे शिबीर पार पडणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांचे वय किमान ८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. विशेषतः सावंतवाडी परिसरातील (सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित) शाळा व महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना या प्रशिक्षणात प्राधान्य दिले जाणार आहे. या शिबिराचे सविस्तर वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल, असे आयोजकांतर्फे कळवण्यात आले आहे.
शिवकालीन युद्धकलेचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरासाठी केवळ १५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्कामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थीला सरावासाठी स्वतंत्र काठी दिली जाणार आहे. राष्ट्रवीर संघाचे श्री. आशिष खैरे हे या शिबिरात प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
हे शिबीर सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी १० मे पर्यंत आपली नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. नावनोंदणीसाठी आपले नाव, गाव, वय आणि संपर्क क्रमांक खालील सदस्यांकडे व्हॉट्सॲपवर पाठवावा किंवा संपर्क साधावा:एकनाथ गुरव: ९०११४८६८८१, संपदा राणे: ९१५८५७८२५९, व प्रमोद मगर: ८६९८३८७१३८ यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या जाज्वल्य इतिहासातील मर्दानी खेळांचे प्रशिक्षण घेण्याची ही सुवर्णसंधी असून, जास्तीत जास्त युवकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.




































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.