loader
Breaking News
Breaking News
Foto

नाना-नानी पार्क हटवू देणार नाही, अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये; आमदार संजय केळकर यांचा इशारा

ठाणे(प्रतिनिधी) - आरोग्य केंद्राच्या वादावरून दोन्ही शिवसेनेत गुरुवारी राडा झाल्याची घटना ताजी असतानाच, आरोग्य केंद्र हवे, पण नाना-नानी पार्कच्या जागी नको. याबाबत आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी मान्य केले होते, तरीही जनतेचा विरोध डावलून आरोग्य विभागाचा कंटेनर ठेवण्यात आला. अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये, असा इशारा देत आमदार संजय केळकर यांनी नाना-नानी पार्क हटवू देणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात केळकर बोलत होते. ज्ञानेश्वर नगर येथे जवळपास उद्यान नसल्याने येथील लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांना नाना नानी पार्क हवे आहे. त्यांची मागणी डावलून इतरांचे हीतसंबंध जपत आरोग्य केंद्राचा कंटेनर जबरदस्तीने आणण्यात आला. याबाबत मी आयुक्त आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यांनी मान्य केल्यानंतरही कंटेनर आणण्यात आला, हे चुकीचे झाले आहे. अधिकारी लोकांचे काम करण्याऐवजी राजकारण करु लागले आहेत, अशी टीका करत केळकर यांनी पार्क हटवू देणार नाही याचा पुनरुच्चार केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माध्यमांशी बोलताना केळकर म्हणाले, भाजप सत्तेत सहभागी झाली आहे, पण सत्ता चालवणारे दुसरे आहेत. त्रुटी आढळून आल्या तर विरोधकांची भूमिका बजावू आणि लोकहिताच्या कामांना पाठिंबा देऊ, अशी भूमिकाही स्पष्ट केली. सॅटीस पुलावर एसटी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. जवळ अग्निशमन केंद्र नसल्याने दुर्घटनेची तीव्रता वेळीच कमी करता आली नाही. भविष्यात अशा घटना घडल्या तर वेळेवर मदत पोहोचावी यासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे अग्निशमन दलाच्या दोन गाड्या उपलब्ध करून देण्याचे अग्निशमन विभागाने मान्य केल्याचे केळकर यांनी सांगितले. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात काही लहान उद्योजकांनी देखील उपस्थित राहून तक्रारी केल्या. कल्याण-पडघा मार्गावर राज्य शासनाची विकासकामे सुरू असून एका मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला काम देण्यात आले आहे. या कंपनीकडून अनेक लहान लहान कंपन्यांनी कामे घेतली आहेत. कार्यदेशानुसार त्यांनी कामे करूनही मुख्य कंपनीने कोट्यवधींची बिले थकवली आहेत, त्यामुळे लहान उद्योजकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत आमदार केळकर यांनी ग्रामीण पोलीस अधिक्षकांशी चर्चा केली असून प्रसंगी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमात प्राप्त तक्रारीनुसार शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करून घोडबंदर येथील सीबीएसइ शाळेची चौकशी करण्यात येणार आहे तर आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आरटीओ दलालमुक्त करण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाच्या आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली. कार्यक्रमात फायनान्शिअल कंपन्यांकडून झालेली फसवणूक, पुनर्विकास योजनेतील फसवणूक आदी तक्रारींची निवेदने प्राप्त झाली. यावेळी आमदार संजय केळकर यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यानिमित्त पंचकव्य डॉक्टर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समतोल फाउंडेशन चे विजय जाधव, अटल फाउंडेशन चे गणेश राजे, डॉ. राजे व अन्य पदाधिकाऱ्यांनी हा सन्मान केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg