रत्नागिरी/कुडाळ: कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या कामात आता मोठी प्रगती दिसून येत आहे. उपलब्ध ताज्या अहवालानुसार, कशेडी ते झाराप या २८०.७१३ कि.मी. अंतरापैकी सुमारे २७२.३९७ कि.मी. (जवळपास ९७ टक्के) रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, रखडलेले उड्डाणपूल आणि काही तांत्रिक कामे मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या महामार्गावरील टप्पा क्र. ९ (तळगाव ते कळमठ) चे ३८.३८ कि.मी. लांबीचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून, टप्पा क्र. ८ (वाकेड ते तळगाव) आणि टप्पा क्र. १० (कळमठ ते झाराप) चे काम ९९.९९ टक्के पूर्ण झाले आहे. हे टप्पे आता वाहतुकीसाठी पूर्णतः सज्ज झाले आहेत.
परशुराम घाट ते आरवली दरम्यानच्या ३४.४५ कि.मी. टप्प्यापैकी ३२.०१ कि.मी. रस्ता तयार झाला आहे. मात्र, चिपळूण येथील उड्डाणपुलाचे काम अजूनही सुरू असून, तो वगळता इतर मार्गिका पूर्ण झाल्या आहेत. तसेच कशेडी ते परशुराम घाट दरम्यानचा खेड येथील रेल्वे उड्डाणपूल (ROB) येत्या १५ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये पूर्वीच्या कंत्राटदाराने (एम.ई.पी. कंपनी) कामात विलंब केल्याने, शासनाने नवीन कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.
आरवली ते कांटे: या टप्प्यातील काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. कांटे ते वाकेड: येथे ९२.४५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामही ३१ मे २०२६ पर्यंत संपवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कशेडी घाटापासून ते सिंधुदुर्गातील झारापपर्यंतच्या प्रवासात आता प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे. काही मोजके उड्डाणपूल आणि तांत्रिक कामे शिल्लक असून, २०२६ च्या पावसाळ्यापूर्वी हा संपूर्ण पट्टा सुसाट होण्याची चिन्हे आहेत. टप्पा अंतर (कि.मी.) सद्यस्थिती अपेक्षित पूर्तता, कशेडी ते परशुराम घाट ४२.३३ ९९.००% मार्च २०२५ (खेड ROB), परशुराम ते आरवली ३४.४५ ९७.८०% उड्डाणपूल प्रगतीत, आरवली ते कांटे ३९.२४ ८७.१०% मे २०२६, कांटे ते वाकेड ४९.१५ ९२.४५% मे २०२६, वाकेड ते झाराप ११५.५४ ९९.९९%..




































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.