loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंब्र्यात मानसिक आजाराने ग्रस्त मोठ्या भावाच्या चाकूच्या हल्ल्यात ८ वर्षीय बहिणीचा मृत्यू

ठाणे (प्रतिनिधी) - गेल्या दोन वर्षांपासून स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या १६ वर्षीय भावाने केलेल्या चाकूच्या हल्ल्यात त्याची ८ वर्षीय बहीण गंभीर जखमी झाली. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मुंब्र्यात घडली. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अल्पवयीन भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्र्यातील एका इमारतीत १५ एप्रिल रोजी पहाटे सुमारे २:३० च्या सुमारास घरात सर्वजण झोपेत असताना ८ वर्षीय मुलीच्या गळ्यावर तिचाच १६ वर्षीय मोठा भावाने चाकूने वार केला. सदर मुलीच्या वडिलांनी आवाज ऐकून जागे होताच मुलाच्या हातात चाकू पाहिला, आणि आरडाओरड होताच तो घराबाहेर पळून गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गंभीररित्या जखमी झालेल्या मुलीला प्रथम खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला अतिदक्षता विभागात ठेवून उपचार सुरू केले; मात्र उपचार सुरू असताना तिचा १९ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता मृत्यू झाला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार, गळ्यावर झालेल्या गंभीर जखमेच्या गुंतागुंतीमुळे मेंदूवर परिणाम होऊन मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मृतक मुलीच्या वडीलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांचा मुलगा हा मागील दोन वर्षांपासून स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

टाइम्स स्पेशल

तसेच घटनेच्या दिवशी तो मोबाईलवर व्हिडीओ पाहत होता आणि त्यातील कृतीची नक्कल करण्याच्या प्रयत्नात ही घटना घडल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी वडिलांनी कोणतीही कायदेशीर तक्रार देण्यास नकार दिला असला, तरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg