loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीतील ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

सावंतवाडी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबईत भेट घेतली. या भेटीत विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार आणि माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर, तालुकाप्रमुख राजू शेटकर, विभागप्रमुख आबा केरकर सुनील गावडे यांचा समावेश होता. यावेळी माजी खासदार विनायक राऊत देखील उपस्थित होते. ​या भेटीदरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि पक्ष संघटनेच्या मजबुतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात असून, उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्याचे समजते. या भेटीमुळे मतदारसंघातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg