अमरावती - जिल्ह्यातील वरुड येथे एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीवर मुलांची वाईट नजर पडू नये, या कारणावरून आई-वडिलांनी स्वतःच्या मुलीचं जबरदस्तीने टक्कल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. माहितीनुसार, संबंधित मुलीकडे परिसरातील एका मुलाने वारंवार वाईट नजरेने पाहत असल्याचा आरोप आहे. याबाबत त्या मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी आई-वडिलांनी मुलीवर दबाव टाकला. मात्र, मुलीने तक्रार देण्यास नकार दिल्यानंतर पालकांनी टोकाचं पाऊल उचलत तिचे केस कापून टाकले.
घटनेनंतर मुलीला काही काळ घरातच बसवून ठेवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने अखेर पोलिसांत धाव घेतली असून, तिच्या तक्रारीवरून पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बालहक्क, मुलींची सुरक्षितता आणि पालकांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुलीच्या संरक्षणाच्या नावाखाली तिच्यावरच अन्याय केल्याची टीका होत आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संबंधित मुलाविरुद्धही तक्रार येते का याकडे लक्ष लागले आहे.




































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.