स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन आयोजित आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेत भरघोस यश संपादन करत उल्लेखनीय कामगिरी केली. यात, कलरिंग कॉम्पिटिशनमध्ये इ.७ वी तील कु. हिना सारंग हिने प्रथम क्रमांक पटकावत मिनी प्रोजेक्टर व चषक मिळविला. कु. तनिष्क पवार याने ‘इलेक्ट्रिक परफॉर्मर अवॉर्ड’ मिळवत चषक व स्कूल बॅग प्राप्त केली. कु. श्री कोरगावकर हिने ‘आर्ट मेस्ट्रो अवॉर्ड’ व चषक मिळविला. कु. हर्ष साटेलकर याने कोलाज मेकिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदक पटकावले. इ. ६ वीतील कु. अवनी शेर्लेकर हिने कलरिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत क्रिकेट किट व चषक प्राप्त केला. कु. प्रत्यूषा घोगले हिने ‘इसेन्ट्रिक परफॉर्मन्स अवॉर्ड’ मिळवत स्कूल बॅग व चषक मिळविला. कु. भूमी नानोस्कर हिने ‘आर्ट मेस्ट्रो अवॉर्ड’ मिळविला, तर कु. राबिया जमादार हिने आंतरराष्ट्रीय पदक पटकावले. हँडरायटिंग स्पर्धेत कु. अवनी शेर्लेकर हिने ‘आर्ट मेस्ट्रो अवॉर्ड’ मिळविला व कु. माज पटेल याने आंतरराष्ट्रीय पदक मिळविले. स्केचिंग स्पर्धेत कु. पृथ्वीराज गवस याने आंतरराष्ट्रीय पदक, तर कु. भुवन दळवी याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
इ. ५ वीतील कोलाज मेकिंग स्पर्धेत कु. वरद राणे याने ‘इसेन्ट्रिक परफॉर्मन्स अवॉर्ड’ मिळवत फुटबॉल व चषक प्राप्त केला. फिंगर अँड थंब स्पर्धेत कु. फेथ फर्नांडिस हिने ‘आर्ट मेस्ट्रो अवॉर्ड’ मिळविला. कु. कुशल तांडेल याने कार्टून मेकिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदक मिळविले. इ.४ थीतील कु. अवधूत चितारी याने कलरिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत क्रिकेट किट व चषक मिळविला. कु. वेद बेळगावकर याने ‘आर्ट मेस्ट्रो अवॉर्ड’ मिळविला. कु. स्वरा वालावलकर व कु. आधिश गोवेकर यांनी आंतरराष्ट्रीय पदके मिळविली. कॅरिकेचर स्पर्धेत कु. सार्थक मालवणकर याने ‘आर्ट मेस्ट्रो अवॉर्ड’ मिळविला. कोलाज मेकिंगमध्ये कु. अधृत गोवेकर याने आंतरराष्ट्रीय पदक पटकावले. इ. ३ रीतील मास्क मेकिंग स्पर्धेत कु. विवान सावंत याने द्वितीय क्रमांक मिळवत साऊंड बार व चषक प्राप्त केला. कु. आद्या कुंभार हिने ‘इसेन्ट्रिक परफॉर्मन्स अवॉर्ड’ मिळविला. कु. कुशल सबनीस, कु. सायली बांदेकर व कु. राधेय मोरजकर यांनी विविध स्पर्धांत आंतरराष्ट्रीय पदके पटकावली. इ. २ रीतील कु. श्रवी पावसकर हिने कलरिंग स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवत इन्फ्लेटेबल स्विमिंग पूल व चषक मिळविला. कु. नवेली जाधव हिने ‘आर्ट मेस्ट्रो अवॉर्ड’ मिळविला, तर कु. पर्णिका देसाई हिने आंतरराष्ट्रीय पदक पटकावले. फिंगर अँड प्रिंट स्पर्धेत कु. सावी कुडतरकर हिने चौथा क्रमांक मिळवत रोलर स्केट्स व चषक मिळविले.
इ.१ ली तील कु. प्रिन्सी राजपुरोहित हिने फिंगर अँड थंब स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदक मिळविले, तर कु. शौर्य राणे याने ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील कला शिक्षिका सौ. सुषमा पालव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच रंगोत्सव सेलिब्रेशन तर्फे शाळेला ‘ग्लोबल स्कूल अवॉर्ड’ जाहीर करण्यात आला व प्रशालेच्या कला शिक्षिका सौ. सुषमा पालव यांना ' मेंटर्स ऑफ एक्सेलेन्स अवॉर्ड ' देऊन गौरविण्यात आले. शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.