loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत कस्टमची मोठी कारवाई, १४ टन डिझेलसह २ बोटी जप्त

दापोली (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील हर्णे जवळील समुद्रात एका मासेमारी बोटीमार्फत इतर बोटींना तस्करीचे डिझेल विकले जात असल्याची गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार या विभागाचे अधीक्षक (P&I) अतुल व्ही. पोतदार यांच्या नेतृत्वाखाली सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या पथकाने २१ एप्रिल २०२६ च्या रात्री कारवाई करत १४ टन डिझेलसह दोन मासेमारी बोटी ताब्यात घेतल्या असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संदर्भात सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार हर्णै जवळील समुद्रात तस्करीचे डीझेल विकले जात असल्याची माहिती मिळाल्यावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्यांनी २१ एप्रिल रोजी मध्यरात्री एका बोटीमधून समुद्रात गस्त सुरु केली असता त्यांना समुद्रात ११ नॉटिकल मैलांवर ‘रत्ना माऊली’ ही संशयित बोट आढळून आली. या बोटीला तसेच तस्करीचे डिझेल खरेदी करणाऱ्या आणखी एका बोटीला अडवण्यात आले. सीमाशुल्क विभागाने ‘रत्ना माऊली’ व अन्य एका बोटीला दाभोळ जेटीकडे आणले. २२ एप्रिल रोजी सकाळी ती तेथे पोहोचताच बोटीसह तिच्या मासे साठविण्याच्या कप्प्यात साठवलेले १४ टन डिझेल जप्त करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

या प्रकरणी ‘रत्ना माऊली’च्या मालक व तांडेल अशा दोघांना अटक करण्यासाठी विशेष सरकारी वकील शेखर डी. तोनपे यांनी दाखल केलेला अर्ज दापोली न्यायालयाने २४ एप्रिल रोजी मंजूर केला. प्राथमिक तपासात गेल्या दोन महिन्यांत ‘रत्ना माऊली’ बोटीमार्फत हर्णै किनाऱ्याजवळ ३०० टनांहून अधिक डिझेलची तस्करी करून विक्री करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सीमाशुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या तस्करीच्या घटना निदर्शनास आल्यास ८७९६८९५९९० किंवा ८४२११८८७५० या क्रमांकांवर कॉल किंवा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg