loader
Breaking News
Breaking News
Foto

पूर्व द्रुतगती मार्गावर बल्कर अर्धवट कलंडला; तत्परतेने टळली संभाव्य कोंडी

ठाणे (प्रतिनिधी) - पूर्व द्रुतगती मार्गावर गुरुवारी पहाटे अवजड वाहनाच्या बिघाडामुळे निर्माण झालेल्या संभाव्य वाहतूक कोंडीला कोपरी वाहतूक शाखेने वेळीच आळा घालत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सिमेंटचा बल्कर अर्धवट अवस्थेत कलंडल्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा ताण येण्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला. सध्या सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे मार्ग आधीच मर्यादित असताना ही घटना घडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची चिन्हे होती. माहिती मिळताच कोपरी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जलद हालचाली सुरू केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने ‘रिव्हर्स लाइन’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळच्या गर्दीच्या वेळेत घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरळीत राहिली. वाहतूक शाखेच्या समन्वयपूर्ण नियोजनामुळे संभाव्य मोठी कोंडी टळली असून हजारो वाहनचालकांचा वेळ वाचला. “अवजड वाहन चालकांनी प्रवासापूर्वी वाहनांची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. छोट्याशा दुर्लक्षामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. तसेच नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, यामुळे सर्वांची सुरक्षितता आणि वेळ वाचेल.” “सकाळच्या गर्दीत अडकू अशी भीती होती, पण पोलिसांनी परिस्थिती उत्तम हाताळली. त्यामुळे प्रवास त्रासदायक न होता सहज पार पडला.”

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg