loader
Breaking News
Breaking News
Foto

गोरेगाव NESCO ड्रग्ज प्रकरणाचे बॉलिवूड कनेक्शन

मुंबईत गाजत असलेल्या नेस्को कॉन्सर्ट ड्रग्ज प्रकरणात आता फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेली जिया जेकब ही साईड ॲक्टर असल्याचे तपासात उघड झाले आहे. तिने काही टीव्ही मालिका आणि लहान-मोठ्या भूमिकांमधून काम केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासादरम्यान माहिती मिळाली की, जिया जेकब गेल्या दोन वर्षांपासून एका फरार असलेल्या मोठ्या ड्रग्ज पेडलरसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. संबंधित पेडलरकडून तिला दर महिन्याला सुमारे 5 लाख रुपये खर्चासाठी दिले जात होते. यामुळे या व्यवहारामागे केवळ वैयक्तिक संबंध नसून आर्थिक देवाणघेवाणीचा मोठा जाळा असल्याचा संशय बळावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिस तपासात जियाच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. अमली पदार्थांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम तिच्या खात्यात जमा केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या आर्थिक व्यवहारांचा तपशील उलगडण्यासाठी पोलिसांनी बँक स्टेटमेंट्स आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. नेस्को येथे आयोजित कॉन्सर्टमध्ये जिया जेकब उपस्थित होती. या कार्यक्रमात ड्रग्जचे सेवन झाल्याचा संशय असून, जियाने स्वतःही अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात इतर काही कलाकार आणि संबंधित व्यक्तींची नावेही समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाइम्स स्पेशल

मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून, फरार असलेल्या मुख्य ड्रग्ज पेडलरचा शोध घेतला जात आहे. फिल्म इंडस्ट्रीशी असलेल्या या कथित कनेक्शनमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, येत्या काळात आणखी मोठी नावे उघड होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg