loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीजवळ रात्रीच्या अंधारात मर्डर!

रत्नागिरी - शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे सुर्‍याने सपासप वार करत हा खुन गुरुवारी रात्री झाल्याचे शक्रवारी कळताच कुवारबाव परिसरात खळबळ उडाली. रत्नागिरी शहरातही याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. सुरज राजाराम झोरे हा २५ वर्षांचा तरूण असून तो मुळचा नायरी, संगमेश्वर येथील आहे. सध्या तो मुंबईला विरार येथे वास्तव्याला होता. याविषयी पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार गुरूवारी रात्री ९.३० ते १०.५३ वा.च्या सुमारास सुरजवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुरज आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणारे संशयित ३ आरोपी सात बंगला परिसराजवळील रेल्वे ट्रॅकजवळ मद्यपान करत बसले होते. त्याच्यात अचानक वाद सुरू झाले आणि त्यांनी सुरजवर चाकून सपासप वार करत प्राणघातक हल्ला केला. जवळपास २५ ते ३० वार त्याच्यावर करण्यात आले. या हल्लयात सुरज गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ३ संशयितांना अटक करण्यात आली आहे. सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड, नजीबूल शेख उर्फ सोनू (तिघांचाही पत्ता माहिती नाही) अशी अटक करण्यात आलेल्या ३ संशयित आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार याबाबत सूरज झोरेची बहिण नंदा रमेश फाले (३२, रा.राजेंद्र कॉम्प्लेक्स, तिरुपती बिल्डिंग दहिसर, मुंबई) हिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांचा भाऊ सूरज हा काही कामानिमित्त रत्नागिरी येथे आलेला होता. गुरुवार २१ मे रोजी रात्री ९.३० ते १०.५३ वा. कालावधीत साईनगर सात बंगल्याच्या मागे संशयित सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड, नजीबूल शेख उर्फ सोनू तिघांनी मिळून सूरजवर सुर्‍याने मानेवर, हातांवर वार करुन त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले, असे फिर्यादीमध्ये तिने नमुद केले आहे. सुरजवर जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना शुक्रवार २२ मे रोजी दु.२.३० वा.सुमारास सुरजचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे करत आहेत.

टाईम्स स्पेशल

मात्र, या तिघांनी त्याला का मारले? याचे कारण अजूनही समजलेले नाही. पोलिस तपास करत आहेत. संशयित आरोपी आणि सूरज हे तिघे एकमेकांचे मित्र असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. हे तिघेही साईनगरजवळील सात बंगला परिसरात असलेल्या रेल्वे ट्रॅकजवळ गुरुवारी रात्री मद्यपान करण्यासाठी बसले होते. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. तेथे त्यांचे भांडण झाले असावे मात्र त्याचे रुपांतर थेट जीव घेण्यापर्यंत होण्याइतके नेमके कोणते गंभीर कारण आहे? याचा शोध पोलिस घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg