loader
Breaking News
Breaking News
Foto

दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी पत्ता विचारत मोबाईल हिसकावले

चिपळूण (वार्ताहर) : दुचाकीवरून आलेल्या तिघांनी रस्ता विचारण्याचा बहाणा करत दोघांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. अलोरे, पोफळी परिसरात झालेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. अलोरे -शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना पोफळी येथील पवारवाडी परिसरात घडली. येथे एका इसमाला चिपळूणला जाण्याचा रस्ता विचारत संशयितांनी त्याच्याशी संवाद साधला. त्यानंतर अचानक त्याला हाताने मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून तिघेही दुचाकीवरून पसार झाले. यानंतर काही वेळातच शिरगाव येथील दत्त मंदिर परिसरात दुसरी घटना घडली. एक महिला देवदर्शनासाठी पायी जात असताना तिला देखील चिपळूणकडे जाणारा रस्ता विचारण्यात आला. बोलता बोलता संशयितांनी तिच्या तोंडावर फटका मारून हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२० मे रोजी घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही संशयित हे काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून फिरत होते. दुचाकीच्या डाव्या बाजूला पांढर्‍या रंगाची प्लास्टिकची पिशवी बांधलेली होती. पोलिस अधिक तपास करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg