संगलट (खेड) (वार्ताहर) - मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथे वीज खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक लागलेल्या विजेच्या तीव्र धक्क्याने (रिटर्न शॉक) पोलवरून खाली कोसळून एका २५ वर्षीय तरुण मजुराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. उरण खिकुराम पोमा (वय २५, मूळ रा. मिडाईमारी लावयपाणी भोसम, ता. राहा, जि. नागाव, राज्य आसाम) असे मृत तरुणाचे नाव आहे. एका अज्ञात व्यक्तीने अचानक डीपी सुरू केल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले असून याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आसाममधील मूळ रहिवासी असलेला उरण पोमा हा मंडणगड परिसरात महावितरणच्या कामासाठी मजूर म्हणून आला होता. २१ मे रोजी संध्याकाळी 7.15 वाजेच्या सुमारास तो कुंबळे येथील एका ‘एल.टी.’ वीज खांबावर चढून तांत्रिक काम करत होता. काम सुरू असतानाच, दळवीवाडी बाजूला असलेल्या डीपीवरून (ट्रान्सफॉर्मर) कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अचानक वीज प्रवाह चालू केला. यामुळे खांबावर काम करणार्या उरण याला विजेचा जोरदार रिटर्न शॉक लागला आणि तो थेट उंचावरून खाली कोसळला.
हा भीषण अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरील इतर सहकार्यांनी आणि ग्रामस्थांनी त्याला तातडीने उपचारासाठी मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. २१ मे रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास मंडणगड पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, कामात हलगर्जीपणा करून वीज प्रवाह चालू करणार्या त्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
























































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.