नाचणे - शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे आणि तत्कालीन तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नाचणे रोड सहकारनगर येथील पीकअप शेड आज पूर्णत्वास गेली. या संदर्भात 28 मार्च रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या समवेत नगरपालिका मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. सहकारनगर येथील असणारी पिकअप शेड दोन महिन्यापूर्वी नूतनीकरण करण्यासाठी पडण्यात आली होती. सदर ठिकाणी नाचणे वाडेकरवाडी, सहकारनगर, नवलाईनगर, रमेशनगर या परिसरातील जेष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच परिसरातील प्रवासी दररोज प्रवास करत असतात. यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत होता.
तरी प्रशासनाला विनंती करून सदरची पीकअप शेड पूर्वी होती त्याच ठिकाणी लवकर बांधुन मिळावी आणि जेष्ठ नागरिकांना, प्रवाशांना उष्म्यामुळे होणार त्रास कमी करावा, ही विनंती करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी शेखर घोसाळे, विजय देसाई, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख, नितीन तळेकर सलील डाफळे, नगरसेवक अमित विलणकर, केतन शेटे, फौजिया मुजावर, विभागप्रमुख मयुरेश पाटील, महिला आघाडीच्या शिवानी माने, दिलावर गोदड राजाराम रहाटे, प्रशांत सुर्वे, साजिद पावसकर, तन्वीर मुजावर, सुफियान जयगडकर, प्रसन्न सुर्वे, तन्वीर मुजावर आणि शिवसैनिक उपस्थित होते. आज नगरपरिषद प्रशासनाने ते काम पूर्णत्वास नेले. परिसरातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याच्या सर्व पदाधिकारी यांना धन्यवाद देत आभार मानले.

























































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.