loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) - भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून रविवार २६ एप्रिल २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात विविध सामाजिक, राजकीय व पर्यटनस्थळांना भेटी देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. रविवार २६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात होणार आहे. सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण व स्वागत कार्यक्रम होईल. सकाळी ११ वाजता कणकवली येथील प्रहार भवनात भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुपारी १ वाजता कणकवली येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर दुपारी ३ वाजता मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देत पर्यटकांशी संवाद साधला जाईल. सायं. ५ वाजता राजकोट किल्ला भेट आणि सायं. ६ वाजता मालवण येथील रॉक गार्डन येथे ‘कॉफी विथ इन्फ्लुएंसर्स’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यातून युवा मोर्चाच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार असल्याचे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg