देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव - साखरप्याची सुकन्या कोलते परिवाराची लाडकी व बिग बॉस मराठी पर्व ६ ची महाविजेती तन्वी उदय कोलते हिचे कोंडगाव मध्ये भव्य स्वागत करण्यात आले. तन्वी कोलते हिच्या विजयाची कोंडगाव बाजारपेठेतून भव्य स्वागत रॅली काढण्यात आली. डी.जे. चे संगीत, फटाक्यांची आतषबाजी चाहत्यांची गर्दी, तन्वी कोलतेचे कुटुंब यामध्ये सामील होते. यावेळी कोंडगावमध्ये अभूतपूर्व उत्साह व ठीकठिकाणी तन्वीचे स्वागत करण्यात आले. हा सर्व सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
अनेक महिलांनी ओवाळणी औक्षण करून तन्वीला पेढा भरवून तिला शुभेच्छा दिल्या. बिग बॉसमधील मिळालेले यश कोंडगाव, साखरपा आणि जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राचे नाव यशाच्या शिखरावर नेलेल्या तन्वीचे अनेकांनी तन्वीच्या कार्यकतृवाला मोठ्या मनाने सलाम केला. एका सामान्य कुटुंबात जन्मलेली व साखरपा येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन एवढ्या मोठ्या यशाच्या शिखर तन्वीने गाठल्याने तिला पाहण्यासाठी पुन्हा एकदा तरुणांनी गर्दी केली होती. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेट्ये, भडकंब्याचे माजी सरपंच बापू शिंदे बहुसंख्य महिला व तरुणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.