खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडी स्टॉपजवळ शुक्रवारी रात्री दुचाकीचा अपघात होऊन चार जण जखमी झाले. अचानक एक पादचारी दुचाकीसमोर आल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास शिंदेवाडी येथून भरणेच्या दिशेने एक दुचाकी जात होती. यावेळी भरणे फागेवाडी स्टॉपजवळ अचानक एक पादचारी दुचाकीसमोर आल्याने दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वारांसह एकूण चार जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणिजधाम यांची 24 तास अपघात मदतीसाठी सेवेत असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक ग्रामस्थ, भरणे नाका सरपंच संतोष गोवळकर तसेच माजी सरपंच खेराडे यांच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यात आले.
या अपघातात जयसिंग सखाराम खोपटकर (वय 60, रा. भरणे जाधववाडी), दिनेश गुलाब चव्हाण (वय 40, रा. भरणे शिंदेवाडी), संस्कृती दिनेश चव्हाण (वय 11, रा. भरणे शिंदेवाडी) आणि समृद्धी दिनेश चव्हाण (वय 12, रा. भरणे शिंदेवाडी) हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचवले.





































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.