loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक हिवताप दिनानिमित्त मोहोपाड्यात प्रभात फेरी

रसायनी (राकेश खराडे) - रायगड जागतिक हिवताप दिनानिमित्त मोहोपाडा येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. उपकेंद्र मोहोपाडा व वासांबे यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या प्रभात फेरीत सुमारे ४० विद्यार्थी व ४ शिक्षक सहभागी झाले होते. तसेच आरोग्य सेवक गणेश भगत, रोशन निंबाळकर, दादासाहेब जगताप तसेच आशा सेविका यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

“हिवतापाला आळा घाला”, “स्वच्छता ठेवा, डास दूर ठेवा” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती केली. फेरीदरम्यान नागरिकांना हिवताप प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश हिवतापासारख्या आजारांबाबत जनजागृती करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg