loader
Breaking News
Breaking News
Foto

वाफोलीत श्री देवी माऊली पंचायतन पुन:प्रतिष्ठापना उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) - वाफोली ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन मंदिराचा पंचकुंडी पुनःप्रतिष्ठापना सोहळा अत्यंत मंगलमय आणि भक्तीपूर्ण वातावरणात दिमाखात संपन्न झाला. हा चार दिवसीय अलौकिक सोहळा अनुभवण्यासाठी केवळ वाफोलीच नव्हे तर परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकांना अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक सोहळा अनुभवता आला. हा सोहळा गावच्या एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थानी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्यानिमित्त मंदिरात २१ ते २४ एप्रिल दरम्यान चार दिवस विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या मुख्य दिवशी सकाळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चाराने आणि शास्त्रोक्त पद्धतीने विधींना सुरुवात झाली. ब्राह्मणवृंद आणि अवसारी देवतांच्या साक्षीने मूर्तींची पुनःप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर माऊलीच्या जयघोषाने आणि मंगलवाद्यांच्या सुरांनी दुमदुमून गेला होता.

टाइम्स स्पेशल

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मुंबई-पुण्यासह परगावी राहणारे चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल झाले होते. तसेच गावातील माहेरवाशिणींनीही श्री दर्शनासाठी हजेरी लावली. गावातील प्रत्येक घरात उत्साहाचे वातावरण होते. मंदिराकडे जाणाऱ्या सर्व मुख्य रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. हा सोहळा म्हणजे गावासाठी एक मोठा लोकोत्सवच ठरला. ​या सोहळ्यानिमित्त वाफोलीसह शिमधडे आणि लगतच्या गावांमधील हजारों भाविकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. ​हा सोहळा यशस्वी करण्यासाठी वाफोलीतील सर्व ग्रामस्थ, देवस्थान समिती आणि स्वयंसेवकांनी अहोरात्र कष्ट घेतले. या सोहळ्यामुळे संपूर्ण वाफोली परिसरात चैतन्याचे आणि मंगलमय वातावरण पसरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg