रत्नागिरी (प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची रत्नागिरी तालुका कार्यकारिणी बैठक माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात उत्साहात पार पडली. तालुकाप्रमुख मयुरेश पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला शिवसेना उपनेते बाळ माने यांचे मार्गदर्शन लाभले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्यांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना संबंधित विभागात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधूनच नियुक्त्या केल्या जातील, असे तालुकाप्रमुख मयुरेश पाटील यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस उपतालुकाप्रमुख विजय देसाई, ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष रहाटे, दीपक सुर्वे, महिला तालुका संघटक ममता जोशी, उप तालुका संघटक समिधा भाटकर, युवा सेना तालुकाप्रमुख युक्ता आंबेकर, पावस विभाग प्रमुख किरण तोडणकर यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मंदार वारेकर यांची कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. बैठकीत विविध राजकीय व सामाजिक उपक्रमांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.



















































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)



























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.