loader
Breaking News
Breaking News
Foto

किरबेटची आर्या पवार आयटीएस (ITS) परीक्षेत राज्यात दुसरी

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा किरबेट नं. १ ची इयत्ता दुसरीमधील गुणवंत विद्यार्थिनी आर्या नरेश पवार हिने आयटीएस (ITS) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. आर्याने या परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक, मंथन टॅलेंट सर्चमध्ये राज्यात चौथी, तसेच बि.डि.एस. मध्ये देशात 8 वा क्रमांक पटकावून शाळेच्या आणि गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आर्या ही अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. या परीक्षेसाठी तिला तिच्या मार्गदर्शक शिक्षिका सुवर्णा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पाटील यांनी घेतलेली मेहनत आणि आर्याने केलेली जिद्दीची तयारी यामुळेच हे यश शक्य झाले आहे. आर्याची शिकण्याची ओढ आणि अभ्यासातील चिकाटी उत्तम आहे. तिने मिळवलेले यश हे तिच्या कष्टाचे आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फलित आहे. आर्याच्या या यशात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तिचे वडील नरेश पवार आणि आई पल्लवी पवार यांचेही मोठे योगदान आहे. घरात अभ्यासाचे वातावरण निर्माण करून तिला नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम तिच्या पालकांनी केले.

टाईम्स स्पेशल

तिच्या या घवघवीत यशामुळे जिल्हा परिषद केंद्रशाळा किरबेट नं. १ चे शिक्षक, मुख्याध्यापक आणि स्थानिक ग्रामस्थांनी आर्या पवार, तिचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षिका सुवर्णा पाटील यांचे विशेष अभिनंदन केले असून आर्याच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मगदूम, धसाडे बाई. के.प्र. भाटकर, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी परिट यांची विशेष प्रेरणा मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg