मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण मतदार संघाची ओळख 2014 पासून हरवलेली होती. ती ओळख परत मिळवण्याचा प्रयत्न अधिकाधिक विकासनिधीच्या माध्यमातून पुर्ण केला जात आहे. जनतेला अपेक्षित विकासकामे पुर्ण करत गावा-गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध आहोत. विकासकामे होत असताना ज्या विश्वासाने शिवसेनेत पक्ष प्रवेश करत त्या सर्व प्रवेशकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवत त्यानी मागणी केलेली जनतेची सर्व विकासकामे 100 टक्के पुर्ण करू असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी येथे बोलताना केले.
बांदिवडे येथील निसर्गप्रभा रिसॉर्ट येथे उबाठा शिवसेनेचे बांदिवडे गावचे उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण परब, विनायक गावकर, अनंत हडकर, आर्या हडकर यांसह अनेक ग्रामस्थ यांनी आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत उपजिल्हाप्रमुख महेश राणे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, विभाग प्रमुख संतोष कोदे, जिल्हापरिषद सदस्या वर्षा सांबारी, प.स. सदस्य गणेश तोंडवळकर, माजी सरपंच तथा खरेदी विक्री संघ संचालक प्रफुल्ल प्रभू, सरपंच आशु मयेकर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, मालवण उपनगराध्यक्षा दिपक पाटकर, जयप्रकाश परुळेकर, शाखा प्रमुख बाळू माळकर, निवेदक आनंद परब यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आम निलेश राणे यांनी खऱ्या शिवसेनेत सर्वांचे स्वागत आहे. गावातील मागणी केलेली रस्ते, खार बंधारे व अन्य विकास कामे पुर्ण केली जाणार. खणीकर्म योजनेतूनही निधी प्राप्त करून रस्ते विकासकामे केली जाणार. महायुती सरकार विकासासाठी कटीबद्ध आहे. राणे साहेब खासदार आहेत, नितेश राणे पालकमंत्री आहेत, मी आमदार आहे. आम्ही जनतेच्या सेवेसाठी आणि विकासासाठी कटीबद्ध असून जनतेला अपेक्षित सर्व विकासकामे पुरी केली जातील असे सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे जनतेचा आवाज बनून अधिवेशन गाजवत आहेत. गेल्या काही महिन्यात 50 कोटी पेक्षा जास्त निधी मालवण तालुक्यासाठी आमदार निलेश राणे यांनी आणला. आणखी निधी येत आहे. यापूर्वीही आणला आहे. तोंडवळी व अन्य किनारी ठिकाणी बंधारा विकासासाठी मोठया प्रमाणात विकासनिधी आमदार निलेश राणे आणत आहेत. याचं विकासकार्यावर प्रेरित होऊन अनेक पक्षप्रवेश होत आहेत. बांदिवडे गावही आता पूर्णपणे भगवामय झाला. सर्वाना सॊबत घेऊन गावा गावांचा सर्वांगीण विकास हेच लक्ष आहे. ग्रामस्थांची मागणी असलेली रस्ते, खार बंधारा व सर्व विकासकामे पुर्ण केली जातील, असे सांगितले.































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.