loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण बाजारपेठेतील श्री देवी भैरवी मंदिराच्या सभागृहाचे दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

मालवण (प्रतिनिधी) - नाभिक समाज हा केवळ व्यवसायापुरता मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपणारा आणि संघर्षातून पुढे आलेला समाज आहे. शिक्षण, उद्योग, राजकारण आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत आज समाजातील युवक उल्लेखनीय कामगिरी करत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील श्री भैरवी देवी मंदिराच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्ष ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेविका मेघा गावकर, नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, नाभिक समाज तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, आनंद आचरेकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, उद्योजक मधुकर चव्हाण तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी कांता चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, नाभिक समाजाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी सामंत यांनी समाजाने केवळ मतदानापुरते मर्यादित न राहता निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, असे मत व्यक्त केले. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत भैरवी मंदिर सभागृह हे भविष्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. नाभिक समाजाचे नेते विजय चव्हाण यांनी मालवण शहरातील नाभिक समाजाचे कार्य संपूर्ण जिल्हयात आदर्शवत आहे. मंडळाची एकी आणि समाजासाठी धावून जाण्याचीवृत्ती यामुळे आता पुढील पिढीने समाजाच्या कार्यात पुढाकार घेऊन ते पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत. समाज एकसंघ आणि मजबुत ठेवण्यासाठी आम्ही आजपर्यंत योगदान दिलेले आहे, आता कुठेतरी थांबावसं वाटत आहेत. तरूणांनी अशाचप्रकारे एकत्रित राहून काम करावे. सर्वसामान्य नाभिक समाजाच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उदय चव्हाण, विजय चव्हाण, मिहीर चव्हाण, भुषण चव्हाण, अंकुश चव्हाण, लवू चव्हाण, ललीत चव्हाण, हेमंत चव्हाण, देवेंद्र चव्हाण, चिन्मय चव्हाण, रोहन चव्हाण, भाग्यश्री चव्हाण, आबली चव्हाण, तेजस चव्हाण, लिशा चव्हाण, राकेश चव्हाण, दिलीप वायंगणकर, आप्पा चिपकर, उद्देश चव्हाण, जगदीश वालावलकर, जयेश कुबल तसेच नाभिक समाज बांधवांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. यावेळी सभागृह आणि श्री भैरवी मंदिर उभारणीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या समाज बांधवांचा विशेष सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg