वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील दहावी केंद्रावर कॉपी प्रकरणात चौकशीची दोन पथके नियुक्त करण्यात आली असून कोकण बोर्डाकडून निवृत्त शिक्षणाधिकारी डी.जी.साळुंखे तर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्रभारी उपशिक्षण अधिकारी संजय माने हे अशी दोन्ही चौकशी पथके शुक्रवारी भुईबावडा दहावी केंद्रावर संबंधित शिक्षक आणि विद्यार्थी यांची कसून चौकशी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यावेळी केंद्रावर असणारे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली. परिसराची माहिती घेतली. केंद्रावर परीक्षा चालू असताना आत प्रवेश करण्यासाठी चोरवाट आहे का? याबाबत पाहणी केली.
चौकशीची पूर्णपणे गोपनीयता पाळली जात असून चौकशी अहवाल जिल्हा परिषद, शिक्षण विभाग आणि बोर्डाला पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतरच बोर्डाकडून संबोधकावर दोषी ठरविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. भुईबावडा केंद्रावर कॉपी प्रकरणामुळे वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. याचे पडसाद तालुक्यात उमटताना दिसत आहेत.
या चौकशीसाठी केंद्रप्रमुख, सुपरवायझर आणि विद्यार्थी यांना बोलवण्यात आले होते. एका एकाला बोलावून जबाब नोंदवण्यात आले आहेत. आजचा चौकशी अहवाल जिल्हा परिषद आणि कोकण बोर्डाकडे दिला जाणार आहे. केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज ही घेण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.