देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील हातिव पंचायत समिती गणातील निवडणूक यंदा संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली. अत्यंत चुरशीची, आरोप–प्रत्यारोपांनी भरलेली आणि शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारी ही लढत अखेर मतदारांनी स्पष्ट निर्णय देत संपवली. महायुतीकडून आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांची ओळख निर्माण केलेले मंगेश बांडागळे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून प्रदीप ढवळ यांच्यात थेट सामना झाला.
निवडणूक प्रचाराच्या संपूर्ण काळात मंगेश बांडागळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संयमित, शांत आणि विकासकेंद्रीत प्रचारावर भर दिला. गावातील पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शेतकरी, युवक व महिलांसाठी केलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या विकास कामांची मांडणी करत त्यांनी मतदारांपर्यंत आपली भूमिका पोहोचवली. दुसरीकडे, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गाव विकास समितीच्या माध्यमातून बांडागळे यांच्यावर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील आरोप करण्यात आले. त्याचबरोबर कुणबी समाजाचे राजकारण उघडपणे पेटवण्याचा प्रयत्न झाला. ‘आम्ही कुणबी समाजाला एकत्र आणत आहोत’ असे सांगत प्रदीप ढवळ हे कुणबी समाजाचे उमेदवार असल्याचे सांगून ‘कुणबी कुणबी’ असे नारे देत प्रचार करण्यात आला. मात्र हातिव पंचायत समिती गणातील सूज्ञ मतदारांनी जातीपातीच्या राजकारणाला ठाम नकार देत विकासालाच मत दिले. या निकालातून “हातिव गणात जातीपातीचे राजकारण चालत नाही” हा स्पष्ट संदेश मतदारांनी दिला आहे. तसेच गाव विकास समितीचा बार पुन्हा एकदा फुसका ठरला.हातिव गणातील बोंड्ये, कासारकोळवण, अंगवली, करंबेळे मोर्डे, हातिव, निगुडवाडी यांसारखी कुणबी समाजाची मोठी लोकसंख्या असलेली गावे असूनही समाजाने जातीऐवजी विकासाला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे सर्वच समाज मोठ्या संख्येने मंगेश बांडागळे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याचे चित्र संपूर्ण मतदार संघात पाहायला मिळाले. त्यामुळे जातीच्या नावावर केलेले राजकारण मतदारांनी मतपेटीतूनच फेटाळून लावले. मुरादपूरमध्ये पंचायत समिती निवडणुकीत आपल्या गावाला पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळत असल्याची जाणीव ठेवून संपूर्ण गावाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत विकासासाठी एकजूट करण्याचा निर्णय झाला आणि सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून बांडागळे यांना एकमुखी पाठिंबा देण्यात आला. याचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला.
याउलट विरोधी उमेदवार प्रदीप ढवळ यांना त्यांच्या स्वतःच्या गावातच अपेक्षित मताधिक्य मिळवता आले नाही. सनगलेवाडी, गोताडवाडी, ढवळवाडी, खंडागळेवाडी येथील समाज बांधव मोठ्या संख्येने बांडागळे यांच्या पाठीशी उभे राहिले. विशेष म्हणजे मोर्डे या ढवळ यांच्या गावातही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, ज्यामुळे त्यांचा पराभव अधिक ठळक ठरला. निवडणूक प्रचारादरम्यान माझ्यावर, तसेच आमदार शेखर निकम यांच्यावर खालच्या पातळीवरील आरोप करण्यात आले. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, जातीपातीचे राजकारण उघडपणे केले गेले. तरीही मंगेश बांडागळे यांचा झालेला विजय हा अशा सर्व प्रयत्नांना दिलेले ठोस उत्तर ठरले आहे. हा विजय विरोधकांना मोठी चपराक देणारा असून विकास कामे आणि स्वच्छ प्रतिमा यांच्या जोरावरच जनतेचा विश्वास जिंकता येतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विजयानंतर प्रतिक्रिया देताना मंगेश बांडागळे म्हणाले, “आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षे मी जनतेचा सेवक म्हणून काम करेन. आजवर जातीपातीचे राजकारण केले नाही आणि भविष्यातही करणार नाही. सर्व समाज, सर्व घटक, वाडी-वस्त्या यांना सोबत घेऊन हातिव पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.” हातिव गणातील या निकालाने विकासाच्या राजकारणावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून येणाऱ्या काळात पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.