loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड-बोरज गावची सुकन्या ऋतुजा सनगरे ही भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल खेड भाजपातर्फे सत्कार

खेड - खेड तालुक्यातील बोरज गावची सुकन्या ऋतुजा सनगरे ही भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर १३ महिन्याची ट्रेनिंग पूर्ण करून आता ती आपल्या मूळ गावी आली असून येथे २१ फेब्रुवारी रोजी गुवाहाटी म्हणजेच बांगलादेशच्या भारतीय सेनेचे रक्षण करण्याकरता जात आहे. यानिमित्ताने तमाम कोकण वासियांच्या वतीने तिचा सत्कार करून खेड तालुक्यासाठी ही एक अभिमानास्पद गोष्ट असून इतर तरुणांना प्रेरणादायी आहे. अशी सदिच्छा व्यक्त करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना भारतीय जनता पार्टीचे नेते खेड नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष व नगरसेवक तथा गटनेते रहीमभाई सहिबोले, भाजपा जिल्हा चिटणीस तथा राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, सोशल मीडिया संयोजक अंकुश मिर्लेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवेस चौगुले, उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg