loader
Breaking News
Breaking News
Foto

माकडे आरसा पळवतात तेव्हा...

दापोली :- दापोली तालुक्यातील जालगाव परिसरामध्ये सध्या माकडांनी उच्छाद मांडला आहे. या माकडांनी आता फळबागायती सोबतच मानवी वस्तीवर मोर्चा वळला असून त्यांच्या माकड चेष्टाना उत आला आहे. पर्यावरण अभ्यासक डॉ.प्रशांत परांजपे यांना माकड चेष्टांनी हैराण केल्याची माहिती त्यांनी दिली. यांच्या घराच्या पडवीत असणाऱ्या बेसिनवरील आरसे दोन वेळा पळवण्याचा विक्रम या माकडांनी केला आहे. तर घरात शिरून घरातील पदार्थ पळवणे आणि बागेतील केळीच्या झाडांची पूर्णतः नासधूस करणे आणि शहाळी काढून पाणी पिऊन खाली फेकून देण्याचा उपक्रम या माकडांनी सुरू केला आहे. यामुळे मेहनतीने पिकविलेल्या बागेचे नुकसान होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परांजपे यांच्या बागायतीवर या माकडांनी लक्ष केले असतानाच त्यांच्या घरावरही त्यांनी आता मोर्चा वळवला आहे. याबाबतची माहिती डॉ. प्रशांत परांजपे यांनी दापोली वनविभाग चे अधिकारी प्रकाश पाटील यांना दिली असून लवकरच या माकडांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येईल आणि त्यांच्या मूळ अधिवासात सोडून देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg