loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली–खेड–मंडणगडमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय; विकासाच्या कामांवर मतदारांचा शिक्कामोर्तब – योगेश कदम

खेड - दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने दणदणीत यश मिळवत मतदारसंघातील बालेकिल्ला कायम राखला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री योगेश कदम यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. या निवडणुकीत विविध पक्षांनी एकत्र येत शिवसेनेला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेच्या बाजूने कौल दिला. हा विजय विकासकामांवरील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे कदम यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ज्या ठिकाणी उमेदवारांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी खचून न जाता पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक निवडणूक नवी शिकवण देणारी असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेषतः मंडणगड तालुक्यातील ६–० असा ऐतिहासिक विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दापोलीतील मित्रपक्षांच्या उमेदवारांनाही शिवसैनिकांनी ताकदीने साथ दिली आणि त्या जागांवरही विजय मिळवला. विजयाचा आनंद साजरा करताना कोणावरही टीका-टिप्पणी न करता संयम राखावा, अशी विनंती कदम यांनी केली. हा विजय व्यक्तींचा नसून विकासाच्या विचारांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टाइम्स स्पेशल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील विकासकामांना गती मिळत असून पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांवर आता अधिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी न मिळूनही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इच्छुकांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. या विजयामध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांचे कदम यांनी पुन्हा एकदा अभिनंदन करत जनतेचा विश्वास कायम राखण्याचा निर्धार व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg