loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग बोडदे येथील ज्येष्ठ राजकीय व सामाजिक नेतृत्व रमेश दळवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

दोडामार्ग - दोडामार्ग तालुक्यातील बोडदे येथील ज्येष्ठ राजकीय व सामाजिक नेतृत्व रमेश अर्जुन दळवी (वय ६६) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर गोवा येथील रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या या आकस्मिक जाण्यामुळे संपूर्ण बोडदे व दोडामार्ग तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरुवातीच्या काळात एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून सुरवात करणाऱ्या दळवी यांनी पुढे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा खजिनदार म्हणूनही अत्यंत यशस्वीपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. विशेषतः माजी सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.

टाइम्स स्पेशल

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे अत्यंत विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दळवी शेवटपर्यंत राणे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बोडदे येथील त्यांच्या निवासस्थानी राजकीय पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी उसळली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg