loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुक्यात जि. प. आणि पं. स. सर्व जागा जिंकत भाजपाचे वर्चस्व

वैभववाडी (प्रतिनिधी) - भाजपाने वैभववाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 3 पैकी 3 तर पंचायत समितीच्या 6 पैकी 6 जागा जिंकत तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. भाजपा विरुद्ध ठाकरे सेना यांच्यात थेट झालेल्या लढतीत भाजपाने ठाकरे सेनेला  भुईसपाट केले आहे.  यापैकी जिल्हा परिषद कोळपे येथून प्रमोद रावराणे व पंचायत समितीतून साधना नकाशे या अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या. खांबळे पंचायत समिती गणातून मंगेश लोके यांनी निवडून येण्याची हॅट्रिक  केली आहे. वैभववाडी तालुक्यातील दोन जिल्हा परिषद व पाच पंचायत समिती गणासाठी निवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी तहसील कार्यालय वैभववाडी येथे झाली. सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून राजकीय पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार व त्यांचे समर्थक यांनी वैभववाडीत गर्दी केली होती. मतमोजणी कक्षात उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनाच परवानगी देण्यात आली होती. निर्धारित वेळेत सकाळी १० वाजता मत मोजणीला सुरुवात करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एकूण मत मोजणीच्या अकरा फेऱ्या करण्यात आल्या होत्या. प्रथम पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष इव्हिएम मशीन मत मोजणी करण्यास सुरवात करण्यात आली. प्रथम भुईबावडा गणापासून सुरुवात करण्यात आली. पहिल्या फेरीतच भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार हे आघाडीवर राहिले. त्यानंतर अगदी शेवटच्या फेरीपर्यत भाजपचे उमेदवार हे आघाडीवर राहिले. त्यामुळे निकालामध्ये मोठी उत्सूकता राहिली नाही. कोकिसरे जिल्हा परिषद प्रभागातून भाजपाच्या श्रावणी रोहन रावराणे या  4151 मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी उबाठा सेनेच्या शुभांगी सरवणकर यांना 1595 मते मिळाली. तर नोटाला 127 मते पडली आहेत. लोरे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाच्या रिद्धी रितेश सुतार यांना 4040 मते मिळाली असून त्या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी उबाठा सेनेच्या दिव्या पाचकुडे यांना  1952 मते मिळाली.तर नोटाला 109 मते मिळाली आहेत. भुईबावडा पंचायत समिती गणातून भाजपचे देवानंद पालांडे विजयी झाले आहेत. त्यांना 2047 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उबाठा सेनेचे जितेंद्र तळेकर यांना 534 मते मिळाली. तर काँग्रेसचे रुपेश गुरव यांना 173 आणि अपक्ष वसंत मोरे यांना 32 मते मिळाली आहेत. तसेच नोटाला 29 मते मिळाली आहेत.

टाइम्स स्पेशल

कोळपे पंचायत समितीतून भाजपाच्या सुवर्णा महेश संसारे 2041 मते मिळवत विजयी झाल्या आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रिहाना गुलजार काझी यांना 685 मते मिळाली आहेत. नोटाला 60 मते मिळाली आहेत. उंबर्डे पंचायत समिती गणातून भाजपाच्या साची कोलते  1917 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उबाठा सेनेच्या स्मिता पाटील यांना 954  मते मिळाली आहेत.तर नोटाला 86 मते पडली आहेत. खांबळे पंचायत समितीतून भाजपचे मंगेश लोके 1940 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी या गणातून निवडून येण्याची हॅट्रिक केली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार उबाठा सेनेचे स्वप्निल रावराणे यांना 844 मध्ये मिळाले आहे.नोटाला 83 मते मिळाली आहेत. लोरे पंचायत समितीतून भाजपाचे सिद्धेश दिलीप रावराणे हे 2051  मताने विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार लक्ष्मण रावराणे यांना 1000 मते मिळाली आहेत. या निवडणुकी भाजपा, ठाकरे सेने शिवाय, राष्ट्रीय काँग्रेसने भुईबावडा पंचायत समिती लढावीत आपले अस्थिव दाखवले तर लोरे पंचायत समितीतुन मनसेने उमेदवारी लढावीत अस्थिव दाखवले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg