loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन दोन महिन्यांपासून बंद; रुग्णांचे हाल

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडल्यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर स्थित असलेल्या या ग्रामीण रुग्णालयाला तसेच ट्रॉमा केअर सेंटरला अपघातग्रस्त रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, आवश्यक असलेले एक्स-रे तपासणीचे साधनच बंद असल्याने रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे. राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडल्यानंतर प्राथमिक उपचारांसाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात रुग्ण दाखल केले जातात. मात्र, एक्स-रे मशीन नादुरुस्त असल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांना रुग्णांना अन्य खासगी अथवा शासकीय रुग्णालयात पाठवावे लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परिणामी, रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून वेळेवर उपचार न मिळाल्याने काही रुग्णांची प्रकृतीही बिघडत असल्याचे चित्र आहे. एक्स-रे मशीन बंद असल्याने रुग्ण, नातेवाईक तसेच सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रुग्णांच्या परिजनांचा आरोप आहे की, रुग्णालय प्रशासनाकडे मूलभूत सुविधांची कमतरता असून एक्स-रे मशीन दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस कारवाई होत नाही.

टाइम्स स्पेशल

यासंदर्भात वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले की, मशीन खराब झाल्यामुळे रुग्णांना इतर रुग्णालयात पाठवावे लागत आहे. मशीन दुरुस्ती अथवा नवीन मशीन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन लवकरात लवकर कार्यान्वित करून रुग्णांना होणारा त्रास दूर करावा, अशी जोरदार मागणी रुग्णांच्या परिजनांसह नागरिकांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg