loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीमती वर्षा लड्डा-उंटवाल, भा.प्र.से., महासंचालक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांची सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीला भेट

रत्नागिरी - दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल, भा.प्र.से. यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, विद्यापीठ अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीला’ भेट देऊन चालू असलेल्या संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा घेऊन संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी वर्गास मार्गदर्शन केले. यावेळी सर्वप्रथम, ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ चे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, डॉ. केतन चौधरी यांनी वर्षा लड्डा यांचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महासंचालक महोदयांनी संशोधन केंद्राच्या झाडगाव येथील मत्स्यालय व मत्स्य संग्रहालय, विस्तार शिक्षण आणि संशोधन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. नवीन संशोधन प्रकल्प सादर करताना कोणत्या काळजी घेणे महत्वाचे आहे या बाबत त्यांनी उपस्थित शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधन केंद्रावर चालू असलेल्या महसुली उत्पादन प्रकल्पाबाबत प्रशंसा व्यक्त केली तसेच महसुली उत्पन्न वाढीकरिता नवीन कल्पनांचा विचार करण्याचे सुचविले. संशोधन केंद्राची पेठकिल्ला, रत्नागिरी येथील नविन ईमारत बांधकाम याबाबत सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

तसेच संशोधन केंद्राच्या भविष्यातील शेतकारीभुमिक कार्यासाठी विविध सूचना त्यांनी केल्यात. यावेळी मत्स्यमहाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे, ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ चे डॉ. आसिफ पागरकर (सहयोगी संशोधन अधिकारी व प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), व्ही. आर. सदावर्ते व अपुर्वा सावंत (वरिष्ठ संशोधन सहाय्यक) उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg