खेड - रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या होमीभाभा बालवैज्ञानिक द्वितीय पातळीवरील प्रात्यक्षिक परीक्षेत रोटरी स्कूलमधील इयत्ता सहावीतील 3 विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. होमीभाभा बालवैज्ञानिक ही परीक्षा तीन पातळींवर घेतली जाते. त्यामध्ये प्रथम पातळी - लेखी परीक्षा, द्वितीय पातळी- प्रात्यक्षिक परीक्षा, अंतिम पातळी - कृतिसंशोधन व मुलाखत अशाप्रकारे या परीक्षेचे स्वरूप असते. होमीभाभा बालवैज्ञानिक द्वितीय पातळीवरील प्रात्यक्षिक परीक्षेतील इ. सहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पूर्वी सूर्यवंशी, अथर्व हलगवार व अर्णव घुंबरे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तम कामगिरी करत होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या मुलाखतीसाठी आपली दावेदारी पक्की केली आहे.
पूर्वी सूर्यवंशी, अथर्व हलगवार व अर्णव घुंबरे या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांचे ज्युनिअर सायंटिस्टचे सुवर्ण, रौप्य व कांस्य यापैकी एक पदक निश्चित झाले आहे. त्यांची मुंबई येथे होणाऱ्या होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या कृतिसंशोधन व मुलाखतीसाठी निवड झाली आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना दिपाली दरेकर, तेजश्री क्षीरसागर, तनुजा चव्हाण, राहूल चव्हाण, प्रसाद सावंत, वैष्णवी धुमाळ या विज्ञान विषय शिक्षकांचे यांचे मोलाचे मार्गदर्शन केले. रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिक भूमिता पटेल यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थ्यांकडून अथक परिश्रम करून घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले आणि होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम पातळी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.