loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यामध्ये शिवसेनेचा एकतर्फी विजय सर्वच्या सर्व जागांवर महायुतीचे वर्चस्व

लांजा (संजय साळवी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेने लांजा तालुक्यात एकतर्फी विजय संपादन केला आहे. जिल्हा परिषदेचे ४ गट आणि पंचायत समितीच्या ८ गणांवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना विरोधकांना चारी मुंड्या चीत केले आहे. भाजपला एक जागा मिळाली आहे, तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खाते देखील उघडता आलेले नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना-भाजपा युती तसेच शिवसेना (उबाठा) - कॉंग्रेस आघाडी यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. आसगे आणि भांबेड या दोन जिल्हा परिषद गटातील निवडणुका या हायव्होल्टेज म्हणून पाहिल्या जात होत्या. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेने विजय संपादन केला आहे, तर साटवली आणि गवाणे जिल्हा परिषद गटात शिवसेना उमेदवारांसाठी पेपर सोपा असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र एकही जागा शिवसेनेला (उबाठा) जिंकता आलेली नाही. जिल्हा परिषदेच्या चारही जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचप्रमाणे ८ पंचायत समिती गणांपैकी भांबेड, गवाणे, खानवली, वेरवली खुर्द या पंचायत समिती गणात शिवसेनेला (उबाठा) विजयाची अपेक्षा होती. मात्र, यापैकी एकाही जागेवर त्यांना यश संपादन करता आले नाही. पंचायत समितीच्या या आठही जागा शिवसेनेने निर्विवाद जिंकल्या आहेत. साटवली जि. प. गट - लिला मोहन घडशी (शिवसेना, मिळालेली मते - ६१६९ मते), पराभूत उमेदवार मनिषा मनोज जाधव (कॉंग्रेस, मिळालेली मते - २०८१), आसगे जि. प. गट - विजयी उमेदवार मनिषा गणेश लाखण (शिवसेना, मिळालेली मते ५६२२), पराभूत उमेदवार अनन्या अभिजीत राजेशिर्के (उबाठा, मिळालेली मते ३६१३), भांबेड जि. प. गट -ङ्गविजयी उमेदवार विनिता विनय गांगण शिवसेना, मिळालेली मते ४९६६), पराभूत उमेदवार अचला हरिश्चंद्र विश्वासराव (उबाठा, मिळालेली मते ३७५४), गवाणे जि. प. गट - विजयी उमेदवार संतोष कृष्णा रेवाळे (शिवसेना, मिळालेली मते ६२७४), पराभूत उमेदवार चेतन शांताराम दळवी (उबाठा), मिळालेली मते ३८७६), आनंद कांबळे (बसपा, मिळालेली मते ५६३) आसगे पंचायत समिती गण - विजयी उमेदवार मानसी सिद्धेश्वर आंबेकर (शिवसेना, मिळालेली मते ३२२२), पराभूत उमेदवार आसावरी किशोर मांडवकर (उबाठा, मिळालेली मते १३५१), श्रावणी सचिन कांबळे (बसपा, मिळालेली मते १९६), वेरवली खुर्द पंचायत समिती गण - विजयी उमेदवार साक्षी भिकाजी चव्हाण (शिवसेना, मिळालेली मते २७२३), पराभूत उमेदवार निलिमा अलविन जाधव (उबाठा, मिळालेली मते १५६६), मानसी मंगेश पवार (अपक्ष, मिळालेली मते २१५), प्रभानवल्ली पंचायत समिती गण - विजयी उमेदवार उमेश अरुण पत्की (शिवसेना, मिळालेली मते २६२१), पराभूत उमेदवार राजेंद्र विश्राम घडशी (उबाठा, मिळालेली मते १२८१), संकेत शांताराम घाग (अपक्ष, मिळालेली मते १४३), आनंद बाबू कांबळे (अपक्ष, मिळालेली मते २२२), भांबेड पंचायत समिती गण - विजयी उमेदवार शैलेश मनोहर खामकर (भाजपा, मिळालेली मते २१४४), पराभूत उमेदवार युवराज मारुती हांदे (उबाठा, मिळालेली मते १८९८), किरण प्रभाकर रेवाळे (मनसे, मिळालेली मते ३७९), सचिन पुंडलिक बेर्डे (अपक्ष, मिळालेली मते ११८). वाकेड पंचायत समिती गण - विजयी उमेदवार रसिका रमाकांत मेस्त्री (शिवसेना, मिळालेली मते २९१७), पराभूत उमेदवार दक्षता अनंत राजापकर (उबाठा, मिळालेली मते ११२८), साटवली पंचायत समिती गण - विजयी उमेदवार आदेश दत्तात्रय आंबोळकर (शिवसेना, मिळालेली मते २२४६), पराभूत उमेदवार रमेश रामभाऊ कदम (उबाठा, मिळालेली मते १८६५), उज्वल बाळकृष्ण पवार (बसपा, मिळालेली मते १२२), गवाणे पंचायत समिती गण - विजयी उमेदवार दिपाली जयवंत साळवी (शिवसेना, मिळालेली मते ३४४६), पराभूत उमेदवार पायल प्रकाश साळवी (उबाठा, मिळालेली मते १९०६), खानवली पंचायत समिती गण - विजयी उमेदवार - यशवंत देऊ वाकडे (शिवसेना, मिळालेली मते २५०२), पराभूत उमेदवार लक्ष्मण सोनू मोर्ये (उबाठा, मिळालेली मते २०९४), चंद्रकांत शांताराम गीतये (बसपा, मिळालेली मते १८७), प्रथमेश रमेश बोडेकर (कॉंग्रेस, मिळालेली मते २८४), संजय वासुदेव रेवाळे (अपक्ष, मिळालेली मते १९७). दरम्यान, शिवसेनेच्या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती विजयी उमेदवांचे आमदार किरण सामंत यांनी अभिनंदन केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg