वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकित भाजप -शिवसेना युतीने आपले वर्चस्व निर्माण केले. 10 पैकी 9 पंचायत समिती जागांवर भाजप-शिवसेना युतीने घवघवीत यश मिळवून आपली सत्ता काबीज केली आहे. तर जिल्हा परिषद निवडणूकित युतीच्या माध्यमातून 5 पैकी 3 जागांवर विजय मिळवला आहे. पंचायत समिती निवडणूकित आपल्या 4 पैकी 4 जागांवर विजय मिळवून भाजपने 100 टक्के विजय संपादन केला. जिल्हा परिषद निवडणूकिमध्ये गुहागर तालुक्यातून असगोली जिल्हा परिषद गटातून विक्रांत जाधव (शिवसेना उबाठा)यांनी संतोष जैतापकर (शिवसेना) यांचा 1 हजार 993 मतांनी पराभव केला. शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून प्रमोद गांधी (मनसे) यांनी डॉ. राजेंद्र पवार (भाजप) यांचा 2 हजार 171 मतांनी पराभव केला. कोंडकारूळ जिल्हा परिषद गटातून अपूर्वा बारगोडे (भाजप) यांनी मानसी घाणेकर (उबाठा) 1 हजार 131 मतांनी पराभव केला. वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून नेत्रा ठाकूर (शिवसेना) यांनी सिद्धी रामगडे (उबाठा) यांचा 4 हजार 217 मतांनी पराभव केला. पडवे जिल्हा परिषद गटातून महेश नाटेकर (शिवसेना) यांनी सचिन बाईत (उबाठा) यांचा 361 मतांनी पराभव केला.
पंचायत समिती निवडणुकीत भाजप -शिवसेना युतीने एकहाती सत्ता मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.पंचायत समिती निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीने 5 पैकी 3 जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपने 1 जागेवर तर शिवसेनेने 2 जागांवर विजय संपादन केला. उबाठाने 1 व मनसेने 1 जागेवर विजय मिळवला. अंजनवेल पंचायत समिती गणातून सारिका दाभोळकर (शिवसेना) यांनी प्राजक्ता जांभारकर (उबाठा) यांचा 349 मतांनी पराभव केला. असगोली पंचायत समिती गणातून उर्वी खैर (उबाठा) यांनी पूनम रावनंग(शिवसेना) यांचा 2 हजार 289 मतांनी पराभव केला. तळवली पंचायत समिती गणातून मंगेश जोशी (भाजप) यांनी संदीप धनावडे (उबाठा) यांचा 311 मतांनी पराभव केला. शृंगारतळी पंचायत समिती गणातून गौरव वेल्हाळ (शिवसेना) यांनी संजय पवार (उबाठा) यांचा 905 मतांनी पराभव केला. मळण पंचायत समिती गणातून मानसी रांगळे (भाजप) यांनी साक्षी चव्हाण (उबाठा) यांचा 78 मतांनी पराभव केला.
कोंडकारूळ पंचायत समिती गणातून प्रणव पोळेकर (शिवसेना) यांनी महेश गोवळकर (उबाठा) यांचा 1 हजार 449 मतांनी पराभव केला.वेळणेश्वर पंचायत समिती गणातून संदीप गोरीवले(शिवसेना) यांनी सचिन जाधव (उबाठा) यांचा 1 हजार 781 मतांनी पराभव केला. शीर पंचायत समिती गणातून स्नेहा शिगवण (भाजप) यांनी ॲड. जोस्ना काताळकर (उबाठा) यांचा 1 हजार 219 मतांनी पराभव केला. पडवे पंचायत समिती गणातून निलेश सुर्वे(भाजप) यांनी रविंद्र आंबेकर (उबाठा) यांचा 997 मतांनी पराभव केला.तर पाचेरी सडा पंचायत समिती गणातून सुचिता घाणेकर (शिवसेना) यांनी शशिकला मोरे(उबाठा) यांचा 162 मतांनी पराभव केला. जिल्हा परिषद निवडणुकीत मनसेने प्रथमच आपले खाते उघडले आहे.











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.