ठाणे (प्रतिनिधी) - अंकित ट्रा" या फेसबुकवरील शेअरमार्केट सल्ल्याच्या आमिषाला बळी पडून एका कसल्टन्सी सर्व्हिसेस व्यावसायिकाची तब्बल ३३ लाख ०८ हजार ५१३ रुपये ७५ पैसे इतकी आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास ठाण्याच्या पोखरण रोड येथे राहणारे तक्रारदार हे आपल्या घरी असताना फेसबुकवर सर्च करत होते. त्यावेळी "अंकित ट्रा" या फेसबुक पेजवर शेअरमार्केटविषयक माहिती आढळल्याने त्यांनी संबंधित पेजचा टेलिग्राम ग्रुप जॉईन केला.
यानंतर टेलिग्रामवर संपर्कात आलेल्या अंकित नावाच्या भामट्याने स्वतःला शेअरमार्केट तज्ज्ञ असल्याचे भासवून डिमॅट अकाउंट हँडलिंग सर्व्हिसेस देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन केल्यानंतर त्याने तक्रारदार यांच्याकडून झिरोदा डिमॅट खात्याचा लॉगिन आयडी व पासवर्ड घेतला. सुरुवातीला अंकित या भामट्याने काही व्यवहार करून नफा करून दाखवला, त्यामुळे तक्रारदार यांचा त्याच्यावर विश्वास बसला. मात्र, १३ जानेवारी २०२६ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता त्याने त्यांच्या डिमॅट खात्यातील २७ लाख १० हजार ८४७.७५ रुपयांचे सर्व शेअर्स विक्री केल्याचे निष्पन्न झाले.
तसेच, तथाकथित “लॉस रिकव्हरी” च्या नावाखाली आणखी १ लाख ३५ हजार रुपये उकळण्यात आले. अशा प्रकारे एकूण ३३ लाख ०८ हजार ५१३.७५ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात अंकित नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.