loader
Breaking News
Breaking News
Foto

घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगारांना खांदेश्‍वर पोलिसांनी केले अवघ्या 36 तासात जेरबंद

पनवेल :- घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगारांना खांदेश्‍वर पोलिसांनी अवघ्या 36 तासात जेरबंद करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील जवळपास पावणे दहा लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात होत असलेल्या दिवसा घरफोडीच्या गुन्हयाना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे व पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त (गन्हे) दिपक साकोरे तसेच पोलीस उपायुक्त परि 03, पनवेल प्रशांत मोहिते, सहा पोलीस आयुक्त साो, भाउसाहेब ढोले यांनी वेळोवेळी केलेल्या सुचना नुसार खांदेश्‍वर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 1 30/2026 भारतिय न्याय संहिता 2023 चे कलम 305(अ), 331(3), 331 (4) या गुन्हयाच्या घटनास्थळी तात्काळ भेट देवून वपोनि स्मिता ढाकणे, मा. पोनि (गुन्हे) सचिन परदेशी यांच्या सुचने नुसार घटनास्थळा वरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून तसेच आरोपी येण्याजाण्याच्या मार्गाचा अभ्यास करून मार्गीकेवरील फुटेज तपासले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच पोलीस खात्यातील उपलब्ध तांत्रिक साधनांच्या मदतीने व गोपनिय बातमीदारांच्या प्राप्त माहीती घेत असताना खांदेश्‍वर पोलीस ठाणेचे सपोनि उत्तम घेगडमल, राजरत्न खैरनार, पोहवा महेश कांबळे, वाघमारे, रणजित पाटील, वैभव शिंदे, धिरेंद्र पाटील, पोशि सचिन पवार, विकास कामनुरकर, स्वप्निल कोळी, युवराज शिवगुंडे, ऋषिकांत परदेशी आदींच्या पथकाला या गुन्ह्यातील आरोपी रफिक माझीद शेख, (35 रा.जोगेश्‍वरी मुंबई), मोहम्मद बिलायत अब्दुल रहिम खान (30 रा.नालासोपारा), शकिल रुबील शेख (30 रा.बांद्रा, मुंबई) या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याबाबत माहीती प्राप्त झाली. सदरबाबत पथकासह शिताफिने ताब्यात घेवून सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नमूद आरोपीकडे केलेल्या तपासात त्यांच्याकडून गुन्हयातील घरफोडी करून चोरलेले 95 ग्रॅम सोन्याचे व 52 ग्रॅम चांदीचे दागीने असे एकूण 9,56,150/- रू कि व गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यारे हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि उत्तम घेगडमल करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

गुन्ह्यातील जवळपास पावणे दहा लाखाचे दागिने केले हस्तगत

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg