loader
Breaking News
Breaking News
Foto

नागरिकांना लुटणाऱ्या तीन भामट्यांसह सराफास अटक

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे शहर परिसरात सामान्य लोकांना बोलण्यात गुंतवून, भूरळ घालून, हातचलाखीने लुबाडणाऱ्या तिघा भामट्यांना व त्यांना मदत करणाऱ्या एका सराफ व्यवसायिकास ठाणे गुन्हे शाखा उल्हासनगर युनिटच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. राजू प्रकाश चव्हाण (48, वडाळा, मुंबई), रमेश विजयकुमार जैस्वाल (49, चेंबूर, मुंबई), संजय दत्ताराम मांगडे (53, चेंबूर, मुंबई) अशी तिघा भामट्यांची तर रामसिंग लालसिंग चौहान (45, वडाळा, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या सराफा व्यवसायिकाचे नाव आहे. सदरची कारवाई कारवाई गुन्हे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड, सहायक पोलिस निरीक्षक विजय काजारी, पोलिस हवालदार राजेंद्र थोरवे, पोलिस शिपाई अशोक थोरवे, पोलिस हवालदार योगेश वाघ, प्रकाश पाटील, रितेश वंजारी, मंगेश जाधव, गणेश गावडे यांनी केलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नोव्हेंबर, डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ या तीन महिन्यांच्या कालावधीत नागरिकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने फसवणूक चोरी करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याअनुषंगाने दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याआदेशानुसार उल्हासनगर गुन्हे शाखा घटक ४ युनिट कार्यालयाकडून त्या कार्यक्षेत्रातील अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी उल्हासनगर परिमंडळ विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा घटक ४चे पोलिस हवालदार राजेंद्र थोरवे यांना मिळालेल्या माहिती तसेच तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ठाणे व मुंबई परिसरात माहिती काढून ते गुन्हे करणाऱ्या टोळीचा मागोवा काढला. याचदरम्यान मुंबईतील राजु प्रकाश चव्हाण (वय ४८), रमेश विजयकुमार जैस्वाल (वय ४९) आणि संजय दत्ताराम मांगडे (वय ५३) त्या तिघांना २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री अटक केली.

टाइम्स स्पेशल

त्यांच्याकडे त्या गुन्हयाचे अनुशंगाने विचारपुस केली असता, त्यांनी डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान ठाणे जिल्हा व मुंबई मध्ये केलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकल्याचे सांगितले. तर काही मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. तसेच या गुन्हयातील आरोपींकडून मुद्देमाल घेवून त्याची विल्हेवाट लावण्यात मदत करणारा मुंबईतील ज्वेलर्स व्यावसायिक रामसिंग लालसिंग चौव्हाण (वय ४५) याला अटक करण्यात आली. तसेच त्या चौघांकडून ठाणे, मुंबई शहर परिसरातील एकूण १२ गुन्हयामधील एकुण १३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे १६ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg